जिल्हा कारागृह मधील बंदी बांधवांच्या जीवनात नव्या वर्षात चांगली वेळ यावी या साठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून घड्याळ भेट.
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्ह्यामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आनंद कांबळे म्हणाले कि सावंतवाडी कारागृह व जिल्हा कारागृह यामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे मोठे योगदान आहे त्याच प्रमाणे जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे अनेक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझ्या बांधवानो तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस लवकरच उजाडून चांगली वेळ येण्यासाठी आम्ही हि घड्याळे आपल्याला भेटवस्तू म्हणून देत आहोत येथून बाहेर पडल्यानंतर आपल्या कुटुंबासमवेत सुखाने व आनंदाने जीवन जगा यानंतरही आमची सामाजिक बांधिलकी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. या वाक्यावरच बंदी बांधवांनी टाळ्यांचा गजर केला. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूपा मुद्राळे याचही विशेष कौतुक अधीक्षक कांबळे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सदस्य रूपा मुद्राळे,,शरदीनी बागवे, लक्ष्मण कदम व रवी जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडला. यावेळी या कार्यक्रमाला वरिष्ठ तुरुंग अधिकारी बी. डी. आगवणे उपस्थित होते तर या उपक्रमासाठी जीवन विद्या मिशन मुंबई च्या सौ. रमा परब तसेच सदगुरू श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशनचे व्यवस्थापक मधुकर सावंत हे दखील उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी उपस्थित बंदी बांधवांना, अधिकारी व कर्मचाऱ्यांना नव्या वर्ष शुभेच्छा दिल्या.
तर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आनंद कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले.
