You are currently viewing स्वागत नववर्षाचे

स्वागत नववर्षाचे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वागत नववर्षाचे*(पादाकुलकक)

 

स्वागत करुया नववर्षाचे

दीप उजळुया चैतन्याचे॥ध्रु॥

 

घन तिमिराचा नाश होउ दे

आनंदाचे वात वाहू दे

परिमल पसरो वातावरणी

बंध ना तुटो हे नात्याचे॥१॥

 

स्वागत करुया………..

 

उगा कशाला जातिभेद हे

कशास व्हावे धर्मभेद हे

मानवतेचा मंत्र जपावा

लक्ष्य असावे नववर्षाचे॥२॥

 

दीप उजळुया चैतन्याचे

स्वागत करुया………….

 

थांबवुया कत्तल वृक्षांची

बूज राखु पर्यावरणाची

कृषीवलाची साथ देउया

रक्षण करुया भूमातेचे॥३॥

 

स्वागत करुया………..

 

सुपीक माझी काळी आई

मोतीयाचा दाणा देई

वात्सल्याने घास भरविते

का विसरावे क्षण सौख्याचे॥४॥

 

स्वागत करुया नववर्षाचे

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

*३१/१२/२०२५*

प्रतिक्रिया व्यक्त करा