You are currently viewing कणकवलीतील भाजप नगरसेवकांनी पालकमंत्री नितेश राणेंची घेतली भेट

कणकवलीतील भाजप नगरसेवकांनी पालकमंत्री नितेश राणेंची घेतली भेट

अधिकृत गट स्थापन झाल्यानंतर शुभाशीर्वादासाठी ओरोस येथे संवाद

कणकवली :

कणकवली नगरपंचायतीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” हा अधिकृत गट स्थापन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचा शुभाशीर्वाद घेतला. ही भेट सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, ओरोस येथे पार पडली.

यावेळी गटनेत्या सुप्रिया समीर नलावडे यांच्यासह भाजप गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. या गटामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून राकेश बळीराम राणे, प्रभाग क्रमांक २ मधून प्रतीक्षा प्रशांत सावंत, प्रभाग क्रमांक ३ मधून स्वप्नील शशिकांत राणे, प्रभाग क्रमांक ५ मधून मेघा अजय गांगन, प्रभाग क्रमांक ९ मधून मेघा महेश सावंत, प्रभाग क्रमांक १० मधून आर्या औदुंबर राणे, प्रभाग क्रमांक १२ मधून मनस्वी मिथुन ठाणेकर तसेच प्रभाग क्रमांक १६ मधून संजय मधुकर कामतेकर यांचा समावेश आहे.

या भेटीदरम्यान कणकवली नगरपंचायतीतील विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच आगामी काळातील कामकाजाबाबत चर्चा झाल्याचे समजते. भाजप गटाने पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा