दिनांक १४ फेब्रुवारी रोजी श्री पृथ्वीराज बर्डे सरांच्या मार्गदर्शनाखाली दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेली ऐतिहासिक तोफ संवर्धन मोहीम काढण्यात आली. या पूर्व नियोजित मोहिमेला २९ जणांनी सहभाग नोंदवला. यापैकी २१ जणांनी ऐतिहासिक तोफेपर्यंत प्रत्यक्ष प्रवास केला. विशेष म्हणजे या मध्ये ८ व ९ वर्षांची मुले व १० वर्षाची एक मुलगी सहभागी झाली होती. या मोहिमेच्या वेळी तोफेपर्यंत जाण्यासाठी गडाच्या पायथायपासून ठीकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आले जेणेकरून तोफ पाहण्यासाठी जाणाऱ्या दुर्ग प्रेमींना तोफेपर्यंत सहज पोहचता येईल. लवकरच ही तोफ गडावर आणण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग प्रयत्न करणार आहे. या मोहिमेत मार्गदर्शक फलकांसाठी श्री विवेक मंडकुलकर वकील यांनीं सहकार्य केले.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित रांगणा गड ऐतिहासिक तोफा संवर्धन मोहीम क्रमांक १ला उस्फुर्त प्रतिसाद
- Post published:फेब्रुवारी 16, 2021
- Post category:बातम्या / सामाजिक
- Post comments:0 Comments