You are currently viewing शिरगाव येथील श्री पावणाई देवीचा ३० डिसेंबरला हरिनाम सप्ताह  

शिरगाव येथील श्री पावणाई देवीचा ३० डिसेंबरला हरिनाम सप्ताह  

शिरगाव येथील श्री पावणाई देवीचा ३० डिसेंबरला हरिनाम सप्ताह

देवगड

माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी आणि भक्ताला दिलेल्या वचनाला जागणारी अशी ख्याती असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगाव येथील जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी पारंपरिक रीतीरिवाजाने भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.

देवगड–निपाणी राज्यमार्गालगत असलेल्या श्री पावणाई देवीच्या सुरेख देवालयात या उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून परिसर भक्तिभावाने उजळून निघणार आहे. माहेरवाशिणींची या ग्रामदेवतेवर विशेष श्रद्धा असून पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी येथे हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या निमित्ताने नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी, माहेरवाशिणी व भाविक मोठ्या संख्येने शिरगावात दाखल होतात.

या हरिनाम सप्ताहास भाविकांनी व भजनी मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री पावणाई देवी देवालय विश्वस्त मंडळ, बारा-पाच मानकरी व ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.

 

 


प्रतिक्रिया व्यक्त करा