You are currently viewing सावंतवाडीतील पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात रवी जाधव यांना आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार

सावंतवाडीतील पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात रवी जाधव यांना आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार

सावंतवाडीतील पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात रवी जाधव यांना आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार

सावंतवाडी

सावंतवाडी येथे भरलेल्या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात युवा कार्यकर्ता रवी जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना आदर्श युवा कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष रमेश बोंद्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत सातत्याने केलेल्या कार्यामुळे रवी जाधव यांनी युवकांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून नमूद केले.
कार्यक्रमास साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना रवी जाधव यांनी या सन्मानाचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना व मार्गदर्शकांना दिले आणि भविष्यातही समाजासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा