*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम वास्तववादी काव्यरचना..*
*”आम्हा कोण वाली”*
निवडणूकांचे सरले वारे
आश्वासनांचे उडले फवारे
पाण्यावाचून वावर खाली
नेते हो,आम्हा कोण वाली? /१/
या वाडी वर,त्या वाडी वर
होऊन गेली “सुंदोपसुंदी”
शेतामधली “मोटर जळली ”
नेते हो, आम्हा कोण वाली /२/
दिल्या आम्ही घोषणा
केले यांचे जयजयकार
खुर्ची, खुर्ची ची संगत झाली
नेते हो, आम्हा कोण वाली. /३/
पंचवार्षिक अर्थ “योजना ”
झाली आता, चिंता नको
शेतामधली पिके ही सुकली
नेते हो, आम्हा कोण वाली /४/
तोच सदरा,गुलालाचा
तीच टोपी या देशाची
प्रचार करुनी चप्पल तुटली
नेते हो, आम्हा कोण वाली /५/
सुन्न आज झाले मन हो
बळीराजाचे हे चित्र पाहूनी
आकांत करुनी,पिके पुसती
नेते हो, आम्हा कोण वाली. /६/
रचना:— मोहन मराठे.
