You are currently viewing कॅमेर्‍यासोबतचं…माझं जगणं..!!

कॅमेर्‍यासोबतचं…माझं जगणं..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतचं…माझं जगणं..!!*

 

मायेचं आभाळ कॅमे-याने

निरभ्र अधिरतेनं पांघरलं

वेटोळं घालून माझ्याभोवती

प्रतिबिंबाचं वारूळ उभारलं..

 

कधीकाळी आपलीच हक्काची

माणसं अनोळखी होतात

कॅमेर्‍यानेचं नात्यांना जपलं

उगाच पुरावे..मागतात..

 

शुभ-अशुभाच्या आभासी वास्तवावर

दुनिया..फोटोशाॅपवर चालत नाही

घडायचं तेचं..घडतं..कॅमे-यात

अंधश्रद्धेला …स्थान नाही..

 

असंख्य ..स्वप्नांचे प्रदेश

माझ्या..हातातून निसटून गेले

कोशात लपणारे..व्यक्तिमत्व

वेषांतर करून..वावरू लागले..

 

एक आगळा वेगळा..डाव

जीवनभर कॅमेर्‍यानेचं मांडला

वास्तव..आभासी करून घेतलं

दुनियेशी झगडा ..कधीचा सोडला..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा