राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत कु. दिव्या राणे हिने मिळविला दुसरा क्रमांक
कणकवली
राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या गटात श्री. दिलीप राणे (आमचे बंधू) यांची द्वितीय कन्या कॅरम चॅम्पियन कु. दिव्या राणे हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या 48 मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण सराव व उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कु. दिव्या राणे हिने कॅरम स्पर्धांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे कॅरम क्षेत्रात दूर्वा व दिव्या राणे या दोन्ही बहिणींनी सातत्याने यश संपादन करत ओसरगावचे नाव तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर उज्वल केले आहे.
या यशामुळे ओसरगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून कु. दिव्या राणे व कुटुंबीयांचे अभिनंदन होत आहे. पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

