*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लवंगलता वृत्त*
*शीर्षक: मागत असतो आपण*
प्रत्येकाला मार्ग चांगला दावत असतो आपण
किती जणांचे सगेसोयरे लागत असतो आपण
देणे घेणे काही नसते तरी जोडतो नाते
मानस नाते सख्ख्याहुन कवटाळत असतो आपण
दुःखी कष्टी दिसता गरजू मदत कधीही करतो
माणुसकीचा धर्म जीवनी पाळत असतो आपण
इथे करावे इथे भरावे हिशोब नसतो नंतर
स्वार्थासाठी किती चुकीचे वागत असतो आपण
नग्न जन्मतो तसेच सरणावरती सारे चढतो
काही नाही नेत साथ पण मागत असतो आपण
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
