तळेखोल येथे बंधारा बांधकामासाठी ग्रामस्थांचे श्रमदान
सावंतवाडी
तळेखोल गावात ग्रामपंचायतच्या पुढाकाराने बंधारा बांधकामासाठी श्रमदान कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध बचत गटांच्या महिला, युवक तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील जलसंधारण व पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात येत असून, सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी, युवकांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रमदान करून सामाजिक एकोप्याचे उत्तम उदाहरण सादर केले.
या उपक्रमामुळे गावातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे तळेखोल गाव जलसंपन्नतेकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून आले.
