You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवांसाठी ‘संकल्प २०२६’ अंतर्गत आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवांसाठी ‘संकल्प २०२६’ अंतर्गत आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवांसाठी ‘संकल्प २०२६’ अंतर्गत आंदोलनाचा इशारा

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व गरजवंत नागरिकांना अत्यावश्यक आणि समाधानकारक आरोग्य सेवा मिळावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा नागरी आरोग्य हक्क समितीच्या वतीने ‘संकल्प २०२६’ अंतर्गत पहिलं पाऊल टाकण्यात आले आहे. याबाबतचे सहकार्य विनंती निवेदन जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था (NGO) तसेच सामाजिक चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात जिल्ह्यातील प्रत्येक गरजवंत रुग्णाला २४ × ७ रुग्णवाहिका सेवा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुका उप-रुग्णालयांमध्ये २४ × ७ तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या बाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर जिल्हास्तरीय जनजागृती करून सनदशीर मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
ही माहिती ज्येष्ठ नागरिक – किसान मोर्चाचे बाळासाहेब सावंत यांनी दिली असून, जिल्ह्यातील सर्व सामाजिक घटकांनी या आरोग्य हक्क चळवळीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा