आंबोली सैनिक स्कूलचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात
श्री . विजय पांचाळ, उपअधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी. सावंतवाडी मा. श्री. विनोद कांबळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व कर्मचारी यांचा सत्कार व शाळेच्या ‘वेध’ वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन !
आंबोली :
आंबोली येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा २१ वा वर्धापन दिन दिनांक २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. विजय पांचाळ, उपअधिक्षक अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून झाला. दि. २२ डिसे. २०२५ रोजी अध्यक्ष श्री सुनिल राऊळ, सरपंच सौ. सावित्री पालयेकर, संचालक जॉय डॉन्टस, श्री. शिवाजी परब, केंद्र प्रमुख आर. बी. गावडे, श्री. विजय नार्वेकर, सैनिक पतपेढी चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, संचालक श्री. राजाराम वळंजू, ऑफिस सेक्रेटरी श्री. दिपक राउळ प्रमुख गावकरी श्री. शशिकांत गावडे. श्री. श्रीकांत गावडे व पालक प्रतिनिधी यांच्याप्रमुख उपस्थितीत गुणवंत कर्मचारी व विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक व बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरात शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात श्री. पांचाळ यांनी मन मनगट बुदधी यांचा सर्वांकष विकास होण्यासाठी शाळेत राबविण्यात येणा-या उपक्रमांचे कौतुक केले. नेतृत्व गुणासोबत पारंपारीक संस्कार व संवेदनशिलता रूजवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनाने झाली. मराठी आणि हिंदी गीतांवर विविध नृत्यप्रकार सादर केले. यावेळी वर्षभरात विविध किडाप्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या सर्व शिक्षक व संस्था कर्मच्या-यांना शाळेचे स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ यांचा शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बेस्ट टिचर श्री. अरूण गावडे, श्री . मायाप्पा शिंदे, संजय पोतदार, नागेश पांढरे, सुभेदार मेजर शिवराज पवार, कॅप्टन जयराम कोळी, सतिश आई र व शिक्षकेतर कर्मचारी श्री. आनंद कुडाळकर, बाबुराव झाडे, इत्यादिंचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता ६वी प्रथम कमांक कॅडेट सर्वेश गावडे, इयत्ता ७वी कॅडेट गौरांग पेडणेकर, इयत्ता ८वी कॅडेट देवेश परब, इयत्ता ९वी कॅडेट सोहम भिके, इयत्ता ११वी कॅडेट रितेश हरमलकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल, शालेय हॉकी, जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप, नेहरु कप फुटबॉल स्पर्धा, जिल्हास्तरीय ज्युदो, बुध्दीबळ, कुस्ती, अॅथलेटिक्स स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंचा, सहशालेय उपक्रम इंग्लिश, गणित, विज्ञान, संगणक विज्ञान, ऑलिंपीयाड, गुरूकुल टॅलेंट सर्च. गणित संवाद परीक्षेतील गुणवंतांचा श्री. विजय पांचाळ, उपअधिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. ह्यषिकेश गावडे यांनी सर्वाचे आभार मानले.
कार्यकमाच्या दुस-या दिवशी २३ डिसें. २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे सैनिक स्कूलच्या आवारात आगमन झाले. सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलाजच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती प्रमूख पाहूण्यांना करून दिली. त्यानंतर प्रमूख पाहूण्याचे आगमन सैनिक स्कूलच्या संचलन मैदानावर झाले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना देवून उत्कृष्ठ सैनिकी संचलन सादर केले. त्यानंतर छोटया सैनिकांनी लाठीकाठी, झांज प्रात्यक्षिक, ज्युदो कराटे, मल्लखांव, लेझिम, वायोनेट फाईट . व्हॅलिकॉसिंग व ऑवस्टॅकल्स इ. विविध मैदानी साहसी प्रात्यक्षिके सादर केली. या साहसी प्रात्यक्षिकांनी प्रमुख अतिथी व पालकांची मने जिंकली.
सर्व मान्यवरांचे शाळेचे प्राचार्य नितीन गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेचा वार्षिक विशेषांक ‘वेध’ चे प्रकाशन प्रमूख पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले. वक्षिस वितरणामध्ये शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यामध्ये इयत्ता १०वी वोर्ड परिक्षा प्रथम क्रमांक प्राप्त कॅडेट अशोक विलास घोडके, व्दितीय क्रमांक कॅडेट निल अक्षय हेगिस्टे. कॅडेट वेदांत रोहीदास वाटकर, तृतीय क्रमांक कॅडेट देवांग शैलेश बैंकर, कॅडेट ओकार मंगेश गावडे, इयत्ता १२वी बोर्ड परिक्षा प्रथम क्रमांक प्राप्त कॅडेट तनुष गुरूनाथ राऊत, व्दितीय क्रमांक कॅडेट ओमसाई संदिप चव्हाण, तृतीय क्रमांक कॅडेट गौरेश शिवानंद नाईक यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेतील व्दितीय क्रमांक प्राप्त कॅडेट गौरांग संदिप पेडणेकर, कॅडेट धनुष गोविंद परव, माध्यमिकविज्ञान प्रतिकृती क्रमांक प्राप्त कॅडेट निल अक्षय हेगिस्टे विभागस्तरावरील विजेत्या फुटबॉल. हॉकी, हॅण्डवॉल संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. लाठीकाठी राज्यस्तर विजेता कॅडेट सोहम खवणेकर, राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेतील विजेता कॅडेटा अर्णव मंगेश काळगे, कराटे क्रिडा प्रकारात ब्लॅक बेल्ट धारक कॅडेट श्रीगणेश चव्हाण, कॅडेट यश धुरी व ब्लु बेल्ट धारक कॅडेट शेवॉन परेरा, एन. सी. सी. बेस्ट कॅडेट देवेश परब यांचा सन्मान करण्यात आला., वेस्ट हाऊस इन अॅकॅडेमिक्स विशालगड हाऊस, वेस्ट हाऊस इन स्पोर्टस् प्रतापगड हाऊस, वेस्ट हाऊस इन को – करिकुलर अॅक्टीव्हिटिज् रायगड हाऊस, चॅपियन हाऊस ऑफ द इयर म्हणून प्रतापगड हाऊसची निवड करण्यात आली. तसेच वेस्ट कॅडेट म्हणून कॅडेट गिरीराज बाळकृष्ण मुंडल्ये व बेस्ट स्पोर्टस्मन म्हणून कॅडेट हर्ष आत्माराम देसाई यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी उपअधिक्षक विनोद कांबळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्याचे कौतूक केले . विद्यार्थ्यांनी सादर केलेली मंत्रमुग्ध करणारी प्रात्यक्षिके पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले . सैनिक स्कूलच्या भौतिक सुविधांचा लाभ घेवून विद्यार्थ्यांनी स्वयंपुर्ण व्हावे असे आवाहन केले. दिवसभर ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली ते निश्चितच कौतूकास पात्र आहेत. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशिक्षकांनी किती परिश्रम घेतले असतील याची प्रचीती येते.
या शाळेने आपला विद्यार्थी सर्वगुण संपन्न करण्याचा संकल्प केलेला आहे असे दिसून येते. समाजातील वातावरण पाहता युवा पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांकडे मैदानातील कौशल्याबरोबरच शारिरिक संपदा संपन्न असल्याचे असल्याचे सांगितले. सैनिक स्कूलच्या रचनात्मक शैक्षणिक कार्यात पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ते सहाय्य केले जाईल असे प्रतिपादन केले. अल्पावधीत या शाळेने उंच झेप घेतली आहे याचा शाळेतील विद्यार्थी व पालकांना अभिमान असायला हवा. संबंधित शिक्षक आणि पालकवर्ग या सर्वाचे योगदान असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.
सैनिक स्कूलचे संस्था अध्यक्ष मा. • सुनिल राऊळ म्हणाले जास्तीत जास्त मूलांचे भवितव्य घडविण्याचे महान कार्य या सैनिक स्कूलच्या माध्यमातून होत आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी चमकदार कामगिरी करत आहे. १० १२ वी च्या शालान्त प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सैनिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागतो याचे श्रेय येथील सर्व शिक्षकांना जाते. या शाळेमधून देश सेवेसाठी मोठया प्रमाणात सैन्य अधिकारी होण्यासाठी एन.डि. ए. परिक्षेत अधिकाधीक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले पाहिजेत. या वर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेउन संस्थेने संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम पारितोषिक प्राप्त केले. राज्यातील सैनिक स्कूलमधून विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी शासनाने स्थापन केलेल्या कमिटीच्या माध्यमातून प्रयत्नशिल असल्याचे सांगितले राष्ट्रभक्तीची संस्कृती शिवरायांच्या प्रेरणेने रुजावी सैनिक स्कूल मधून योध्दे बनावेत असा आशावाद व्यक्त केला.
.
आभार प्रदर्शन प्राचार्य नितीन गावडे यांनी केले. इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांनी ऑबस्टॅकल प्रात्याक्षिके सादर केली . सुत्रसंचालन श्री . ह्यषिकेश गावडे व श्री . हंबिरराव अडकूरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ, संचालक श्री. शिवाजी परब. ऑ. कॅप्टन श्री. दिनानाथ सावंत, श्री. जॉय डॉन्टस, श्री. राजाराम वळंजू, सैनिक नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, माजी सैनिक सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे. श्री. आत्माराम गावडे.. सैनिक स्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री सुरेश गावडे. सामाजिक कार्यकर्ते श्री . विजय नार्वेकर पालक प्रतिनिधी श्री. संतोष कुमार दळवी श्री. प्रमोद नेवगी श्रीम शर्वरी शशिकांत गवस. श्री . भरमा पाटील. श्रीम. रूषिता पाताडे. श्री . मनदिप मलिक व श्रीम. गंधाली मुंडल्ये पत्रकार श्री. विजय राऊत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आंबोली ग्रामस्थ, समस्त पालकवर्ग व पंचकोशीतील आजी माजी सैनिक बांधव व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
