You are currently viewing जागतिक किडनी दिनानिमित्त नर्मदा किडनी फाउंडेशनकडून देशव्यापी स्पर्धांचे आयोजन

जागतिक किडनी दिनानिमित्त नर्मदा किडनी फाउंडेशनकडून देशव्यापी स्पर्धांचे आयोजन

जागतिक किडनी दिनानिमित्त नर्मदा किडनी फाउंडेशनकडून देशव्यापी स्पर्धांचे आयोजन

नर्मदा किडनी फाउंडेशन ही सेवाभावी संस्था गेली ३२ वर्षे समाजासाठी कार्यरत असून, सर्वसामान्य लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे, रुग्णांना योग्य काळजी व मार्गदर्शन देणे तसेच समाजात अवयवदानाबाबत जनजागृती करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नर्मदा किडनी फाउंडेशन वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून १२ मार्च २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून, किडनीची काळजी व अवयवदान या विषयांवर आधारित लघुपट, घोषवाक्य, कविता आणि भित्तीपत्र स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धा पूर्णतः निःशुल्क असून, भारतभरातील सर्व वयोगटांतील व सर्व स्तरांतील नागरिकांसाठी खुल्या आहेत. स्पर्धांविषयी सविस्तर माहिती व सहभागी होण्यासाठीचा अर्ज www.narmadakidney.org या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या उपक्रमातून किडनी आरोग्य व अवयवदानाविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याचा नर्मदा किडनी फाउंडेशनचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा