सिंधुदुर्गनगरी
कुडाळ तालुक्यातील मौजे- ओरोस प्राधिकरण जयवंती अपार्टमेंट पहिला मजला, मौजे रानबांबुळी परबवाडी, मौजे- ओरोस देऊळवाडी, मौजे कुडाळ लक्ष्मीवाडी या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यातील मौजे- अणाव दाभाचीवाडी 50 मीटर परिसर, मौजे पिंगुळी चिंदरकरवाडी 50 मीटर परिसर व मौजे पिंगुळी गुढीपूर शिक्षक कॉलनी 50 मीटर या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे मौजे- अणाव दाभाचीवाडी दिनांक 15 सप्टेंबर 2020 आणि मौजे पिंगुळी चिंदरकरवाडी व गुढीपूर शिक्षक कॉलनी दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.