*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
रेशमाचा झुला
रेशमाचा झुला झुले
माझ्याच या नयनात
अहो कोणी तरी आले
होते माझीया स्वप्नात
अनामिक ओढ अशी
देतो रेशमांचा झुला
झुलवतो भावनांना
मार्गच सुखाचा खुला
वारा वाहे विचारांचा
जेंव्हा वाहे तो अंतरी
रेशमी झुला झुलवी
कल्पनेला शब्दांवरी
फुलपाखरु प्रमाणे
मन माझे अलवार
करतेच आनंदाशी
भाववेडा हा करार
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक
