*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाव सोडते नदी किनार*
थंडी गुलाबी हवा शराबी
कोवळ्या उन्हाची वेगळीच चव
स्वेटर मफलर आले कामाला
शांतता पसरली येथे निरव
समाधान सांडतय चेह-यावरती
शालीची नाही आता *जरूर*
मफलर काढतो आठवण तुझी
आडवतो उडणारे केस भुरभुर
आठवण छळते रोज जरी
मनाला घातलीय पाबंदी
कविता भेटते तेवढी पुरे
उडायच नाही *स्वच्छंदी*
भेट आभासी रोज रोजची
बळ देतसे *जगण्याला*
अर्थ मिळतो अनर्थ टळतो
साक्षी ठेवून पवित्र घाटाला
दर्शन होता नियमित सकाळी
कविता स्फुरते *बिनतक्रार*
नाही लागत घ्यावे उत्तेजक
*नाव सोडते नदी “किनार”*
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/92424157
