सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार तौकीर शेख यांनी विजय संपादन केला आहे. बाहेरचावाडा प्रभाग क्रमांक १ मधून ते निवडणूक रिंगणात होते. चुरशीच्या लढतीनंतर तौकीर शेख यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत यश मिळवले.
या विजयामुळे सावंतवाडी नगरपरिषदेत काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयानंतर आनंदोत्सव साजरा केला. तौकीर शेख यांच्या विजयाने बाहेरचावाडा प्रभागात काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
