You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेत भाजपचा झेंडा; राजन गिरप विजयी
Oplus_16908288

वेंगुर्ला नगरपरिषदेत भाजपचा झेंडा; राजन गिरप विजयी

वेंगुर्ला :

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजन गिरप यांनी स्पष्ट बहुमतासह ४३० मतांनी विजय मिळवला आहे. झालेल्या मतमोजणीत राजन गिरप यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावले.

मतमोजणी निकाल :

राजन गिरप (भाजपा) – २५४९ मते

पिंटू गावडे (शिंदे सेना) – २११९ मते

विलास गावडे (काँग्रेस) – १८५४ मते

या विजयामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा