You are currently viewing सत्तासंघर्ष सावंतवाडी नगरपरिषदेचा; मतमोजणीला सुरुवात
Oplus_16908288

सत्तासंघर्ष सावंतवाडी नगरपरिषदेचा; मतमोजणीला सुरुवात

पहिल्या फेरीत श्रद्धाराजे भोसले यांची ३२४ मतांची निर्णायक आघाडी

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सावंतवाडीत सुरुवात झाली असून, प्रारंभीच सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार युवराजी श्रद्धाराजे भोसले यांनी भक्कम आघाडी घेतली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ॲड. निता सावंत-कविटकर, शिवसेनेच्या सीमा मठकर, काँग्रेसच्या साक्षी वंजारी तसेच अपक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्याशी थेट लढत असताना श्रद्धाराजे भोसले यांनी ३२४ मतांची आघाडी मिळवत आपली ताकद स्पष्ट केली आहे.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चुरस दिसून येत असली तरी भाजप उमेदवाराची आघाडी कायम असून, सावंतवाडीच्या राजकीय चित्रावर भाजपचा प्रभाव वाढताना दिसत आहे. अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा