*सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य दारू मटका जुगार धंद्यांना थारा न देण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या घोषणेचे वाजलेत तीन तेरा.*
*सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेली किरकोळ कारवाई वगळता जिल्ह्यात अवैध दारू,मटका,जुगार व इतर अवैध धंदे जोमात सुरू- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य दारू,मटका,जुगार व इतर अमली पदार्थ कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्वतः पालकमंत्री यांनी कणकवली येथील मटका व्यवसायावर धाड टाकत कणकवली पोलीस स्थानकातील निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई देखील केली होती, त्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत काही ठिकाणी धाडी टाकत अवैद्य धंदे बंद करण्याची पावले देखील उचलण्यात आली होती. परंतु गेल्या महिनाभरापासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक मटका व्यवसाय खुलेआमपणे सुरू झालेले दिसून येत आहेत. सदरचे अवैध धंदे सुरू झाले असताना पालकमंत्र्यांची भूमिका सद्यस्थिती मात्र गुलदस्त्यात गेल्याची दिसून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी काही महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अवैद्य धंदे पूर्णपणे बंद करण्याच्या घोषणेचे मात्र तीन तेरा वाजल्याची टीका मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
