रियाज खान यांची शिंदे युवासेना सावंतवाडी तालुका प्रमुखपदी निवड…
सावंतवाडी
शिंदे युवासेनेच्या सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी रियाज खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी ही घोषणा केली असून, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत खान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पुरवेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार रियाज खान यांच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीनंतर रियाज खान यांच्यावर प्रामुख्याने बांदा, इन्सुली, मळेवाड आणि आरोंदा या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या भागात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ते काम करणार आहेत. या नियुक्तीबद्दल रियाज खान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळात या परिसरातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
