You are currently viewing भांडुपगावच्या शिवाई विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे,सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक मंत्रमुग्ध!

भांडुपगावच्या शिवाई विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे,सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक मंत्रमुग्ध!

मुंबई –

आज आम्ही जे काही उच्चपदस्थ पदी आहोत ते या शाळेतील गुरुजनांनी दिलेल्या संस्कार आणि संस्कृती मुळेच असे शिवाई विद्यामंदिर शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रमुख पाहुणे अँड सौ. रोहिणी प्रकाश तांबे, इंजिनिअर वैभव अधिकराव मुटल यांनी विद्या वैभव शिक्षण मंडळ शिवाई शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी दिपप्रज्वलन करून उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी, पालक, रसिक प्रेक्षकांना संबोधित करताना प्रतिपादन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर देवराव सरोदे, एल विभाग शिक्षक अध्यक्ष सत्य प्रकाश राय, सचिव गौरी सदाशिव भोईर, उपसचिव डॉ. रंजना तामोरे, कोषाध्यक्ष मयुरेश भोईर, मुणाल भोईर,मुख्याध्यापक रतन हिरामण भालेराव, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा भाये , पालक शिक्षक संघ समिती उपाध्यक्ष सहसचिव आदी मान्यवर उपस्थित होते. इंजिनीअर श्री.वैभव अधिकराव मुटल यांने सांगितले की, खरंतर शिवाई विद्यामंदिर शाळेने खुप काही दिलं एक सोनेरी काळ दिला काही विशिष्ट मुल्य दिल्यानं त्यावर चालतोय असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर देवराव सरोदे म्हणाले की, या शाळेने नेहमीचं शैक्षणिक दर्जा राखत प्रगती साधताना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. एल विभाग शिक्षक अध्यक्ष सत्य प्रकाश राय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थान सचिव गौरी सदाशिव भोईर यांनी भुषविले. त्या म्हणाल्या आज सर्व विद्यार्थी वेशभूषा करून आलेले पाहताना त्यांना कधी एकदा नुत्य सादर करतो असे झाले असून यामधून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जपली जात असल्याचे समाधान लाभते आहे. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षक परिश्रम घेत आहेत. हे यातून दिसून येत आहे असे सांगितले. सुरूवातीला जेष्ठ शिक्षिका सौ .सपना शिरीष निकम यांनी उपस्थितांचा परिचित करून दिला. सहशिक्षक भास्कर हारेर, अजित जगदाळे, सुनील खाडे आदी शिक्षकवृंदाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या रंगतदार स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली एरम, पूजा संसारे यांनी मौलिक शब्दात केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा