You are currently viewing साहित्यिक डॉ.जयद्रथ आखाडे यांना राष्ट्रीय पुरस्कार

साहित्यिक डॉ.जयद्रथ आखाडे यांना राष्ट्रीय पुरस्कार

यमुनानगर निगडी :

भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्या द्वारा डॉ श्री जयद्रथ आत्माराम आखाडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक राज्यांतील मान्यवर कवी कवयित्री, कलाकार, पत्रकार, नाटककार , लेखक यांची वेगवेगळ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी झडोंदा गाव, पंचशील भवन – दिल्ली येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्रातुन पुणे जिल्ह्यातील कवीवर्य डॉ श्री जयद्रथ आत्माराम आखाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अवार्ड- २०२५ पुरस्कार देण्यात आला.

भा.द.साहित्य अकादमी – दिल्ली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. डॉ. एस पी सुमनाक्षर यांच्या शुभ हस्ते आणि आयु. संघ प्रिय गौतम , माजी केंद्रीय मंत्री, प्रमुख संस्थापक अध्यक्ष यांचे उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याबद्दल त्यांचे पिंपरी चिंचवड च्या विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा