You are currently viewing निरोगी जीवनासाठी योग आवश्यक — डॉ.तुळशीराम रावराणे

निरोगी जीवनासाठी योग आवश्यक — डॉ.तुळशीराम रावराणे

*निरोगी जीवनासाठी योग आवश्यक — डॉ.तुळशीराम रावराणे

वैभववाडी

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), IQAC व PM-USHA विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित नावळे, ता. वैभववाडी येथे आयोजित पाच दिवसीय योग शिबीराचे उद्घाटन आज बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वाजता उत्साहात पार पडले.
योग शिबिर उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी योगशिक्षक डॉ. तुळशीराम रावराणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे मानवी जीवनात महत्व सांगून विविध योगासने व त्यांचे शारीरिक-मानसिक लाभ समजावून सांगत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे आसनांचे सादरीकरण केले.
विशेष म्हणजे या योग शिबिरात NSS स्वयंसेवक, प्राध्यापक व नावळे गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
या प्रसंगी प्रा.संजीवनी पाटील व प्रा. आरती भारमल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. सत्यजित राजे यांनी करून दिली. सुत्रसंचलन डॉ.विजय पैठणे तर आभार प्रदर्शन प्रा. सतिश करपे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा