*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी कवी श्री विलास कुलकर्णी आप्पा लिखित अप्रतिम लावणी*
*मॉल…*
चला जोडीनं कारभारी मॉलमंदी जाऊ
फुकाट थंडी थंडी एसीची हवा खाऊ l
एका दिसाचा फकस्त लागलाय सेल
एका वर एक फ्री मिळेल समदा माल
कसा मोह टाळू सांगा काय काय घेऊ
फुकाट थंडी थंडी एसीची हवा खाऊ l
पर्स साडी चप्पल नको उगीच दिखाऊ
सेल असला तरीही चांगली पाहून घेऊ
नक्षीदार शिडीने वरती माळ्यावर जाऊ
फुकाट थंडी थंडी एसीची हवा खाऊ l
सांभाळा तुम्ही पोराला मॉल घेते बघून
पाहून भारी झगमग डोळे गेलेत दिपून
नव्या साडीत मस्तानी उठून दिसेल राऊ
फुकाट थंडी थंडी एसी ची हवा खाऊ l
विलास कुलकर्णी
मीरा रोड
