You are currently viewing कुडाळमध्ये ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन…

कुडाळमध्ये ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन…

कुडाळमध्ये ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन…

कुडाळ

महाराष्ट्र शासन मान्य सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण विभाग ग्रंथालय संघ यांच्या शिफारशीने राव बहाददूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळ या संस्थे मार्फत ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२६ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त इच्छूकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर यांनी केले आहे. या वर्गाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गेली २५ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ग्रंथालय संचालनालयाच्या मान्यतेने हा प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहे. यावर्षीही हा वर्ग १ जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. वर्गाचा कालावधी सहा महिन्यांचा असून दर महिन्यातील शनिवारी व रविवारी असे आठवड्‌यातून दोन दिवस या वर्गाचे प्रशिक्षण होणार आहे. प्रत्यक्ष ग्रंथालयीन कामकाजाच्या प्रात्यक्षिकांचा त्यात समावेश राहील. तज्ञ व अनुभवी शिक्षकांडून हे प्रशिक्षण देण्यात येते. वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. मात्र बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

या वर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी जिल्हा ग्रंथालयाशी संपर्क साधावा. या वर्गाच्या प्रवेशाची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मर्यादित प्रवेश शिल्लक आहेत. सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या सेवकांना प्राध्यान्य राहील. अधिक माहितीसाठी वाचनालयाचे ग्रंथपाल तथा वर्ग व्यवस्थापक राजन पांचाळ यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३०२६७३५ यावर सकाळी ९ ते १२ सायं ३ ते ७ या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा