You are currently viewing स्वरभास्कर

स्वरभास्कर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”स्वरभास्कर”*

 

स्वरभास्कर भीमसेनजींना करू वंदन

शास्त्रीय संगीताचा वाढवला विश्वात सन्मानIIधृII

 

जन्मले कर्नाटका धारवाड रोण गावांत

माता रमाबाई पिता गुरुराज शिक्षक ज्ञात

हिंदुस्तानी संगीतातील गायक होत महानII1II

 

अकराव्या वर्षी गेले घरांतून पळून

संगीत शिकण्यासाठी फिरले वणवण

खिशांत लक्ष्मी नसतां शिकले कष्ट करूनII2II

 

पित्याने आणले गावी भिमसेनना शोधून

कुंदगोळला किराणा घराण्यात झाले शिक्षण

सवाई गंधर्व गुरूंनी केले अनुग्रहितII3II

 

पंडितजींनी घराणं परंपरा केली जतन

रियाज केला अठरा तास नित्यनेमानं

सर्व गायकींच्या अभ्यासाने केली सिद्धी प्राप्तII4II

 

अनेक शिष्य घडवले गुरु अनुग्रहांन

सवाई गंधर्व उत्सव सुरू केला कृतज्ञतेनं

संगीत नृत्य नाट्य संस्कृतीचा केला सन्मानII5II

 

कलाश्री चे निर्माते संगीतार्थ वेचिले जीवन

पुरस्कार बहु प्राप्त झाले महाराष्ट्र भूषण

मिळाले पद्मश्री पद्मविभूषण भारतरत्नII6II

 

स्वरभास्करांचा स्वर्गीय स्वर आहे महान

सर्व सप्तकी फिरणारा हुकमी आवाज गान

अमर झाले संगीतज्ञ अढळपदी अंबरातII7II

 

बुवांचे मधुर आवाज स्वर्गीय आहे बुलंद

विठ्ठलाचे संतांचे बुवांचे हृदयस्थ नातं

अभंग सदा देती ऊर्जा उमंग अनंतII8II

 

©️ कवी.श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा