*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खापर ..तुझ्यावर..फोडायचं..!!*
तस माझ बरंवाईट
तू फारसं केले नाहीस
तरीही मला तुझ्यावर
खापर फोडायचं …
माझं नात छळण्याच
तुझं ते सोसण्याच
तक्रार तुझ्या असण्याचीच
तुझ्यावरच खापर फोडायचं ..
तसे माझ्या कैदखान्याला
गज उरले नाही
तुलाच खेटून उभ राहायचं
तुझ्यावरच खापर फोडायचं ..
एका हाताला समजलं
ते तू दुस-या हाताने लपवलेलं
हातभर ..अंतरावर जरी तू
तरीही तुझ्यावरच खापर फोडायचं
आताश्या भीती वाटते
मरणं जवळ आल्याची
मरणाचं.. कारण तूच आहेस
अवसेला तुझ्यावरच खापर फोडायचं
तुला माझी तशी सवय आहे
मला ठावूक मी चुकतो आहे
तरीही जातांना माझ्या सवयीने
खापर तुझ्यावरच फोडायचं ..!!
अस्मितेच्या माझ्या आरश्यावर
मला तुझं प्रतिबिंब नको
फकिराचे.. मन माझे
मऊशार झुल.. अंगावर नको..
बाबा ठाकूर
