दोडामार्ग
मुळस-हेवाळे येथे गेले तीन दिवस सुरू असलेल्या उपोषण स्थळी आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सावंतवाडी राजू धारपवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी हर्षद बग यांनी उपोषणस्थळी भेट दिली व दत्ताराम देसाई यांच्याशी अमित सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन चर्चा केली व श्री. सामंत यांनी आपण हा विषय सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलून लवकरच यावर तोडगा काढू असे अश्वाशीत केले व संपूर्ण राष्ट्रवादी आपल्या सोबत कायम असल्याचे सांगितले .
यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, उदय जाधव, अक्षय देसाई, भाऊसाहेब देसाई, आदित्य देसाई, समीर देसाई,आत्माराम सडेकर इतर ग्रामस्थ उपस्थित होते.