You are currently viewing समाज विकास संस्था आणि दान उत्सव समितीचा महाराष्ट्र एक हात मदतीचा उपक्रम

समाज विकास संस्था आणि दान उत्सव समितीचा महाराष्ट्र एक हात मदतीचा उपक्रम

*रग दानाचा उत्सव उमरगा परिसरातील थंडीमध्ये उबदारपणाची मदत…*

उमरगा :

उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या अनेक गुणवंतांच्या मदतीतून रस्त्यावर झोपणारे,एसटीने प्रवास करणारे, मागून खाणारे, झोपडीत राहणारे, बेघर असणारे, अशा सर्व गरजवंतांच्यासाठी मदत करून रग दानाचा उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मित्रांनी 200 ब्लॅंकेट देऊन मदतीचा महोत्सव घडवून आणला. यात निशिकांत मूपिड मुंबई,ऍड. प्रवीणजी तोतला उमरगा, विश्वनाथ (अण्णा) तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोकविकास मंच पुणे.डॉक्टर कल्पना आणि निखिल वाघ.उमरगा,संजय कोथळीकर सर उमरगा, संजीवजी तारे सर पुणे,सतीश पवार धवल क्रांती दुग्ध शीतकरण केंद्र नाइचाकूर,विद्याताई वाघ उपेक्षितांचा आधार उमरगा, ज्योतीताई कावळे समाजसेविका उमरगा,राजू सगर साहेब कॉन्ट्रॅक्टर उमरग, psi भराटे सर,PI प्रल्हाद सूर्यवंशी पोलीस स्टेशन उमरगा, प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब उगले,मनोहर सूर्यवंशी साहेब शिवपुरी,मॉर्निग वॉक मार्गदर्शक उमरगा. या दानशूर यांनी सक्रिय सहभाग घेऊन मानवतेचा संदेश मानवतेची हाक देऊन तमाम महाराष्ट्रीयनाना मदतीचा पायंडा पाडून दिल्याचे कौतुक अनेक मित्र परिवारातून होत आहे. या कार्यासाठी भूमिपुत्र वाघ योगगुरु माने गुरुजी, अक्षय कामले यांनी विशेष परिश्रम घेतले

दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक मित्र एकत्र येतात.रग,चादर एकत्र करतात, आणि गरिबांच्या मदतीला धावून जातात. हा मदतीचा महोत्सव पूर्ण महाराष्ट्रातील घडावा अशी इच्छा भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उमरगा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जन्म झालेल्या बाळा नां आणि आयांना,सोबत दवाखान्यात ऍडमिट असलेल्या गरजूवंतांना, एसटीने प्रवास करणाऱ्या वृद्ध लोकांना, झोपडीत राहणाऱ्या लेकरा बाळांना लोकांना रगीची मदत करून मानवी मूल्य जपण्याचा जणू संदेशच त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा