You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयाचे जिल्हा परिषद शाळा नावळे येथे सात दिवसीय निवासी शिबीर

वैभववाडी महाविद्यालयाचे जिल्हा परिषद शाळा नावळे येथे सात दिवसीय निवासी शिबीर

*वैभववाडी महाविद्यालयाचे जिल्हा परिषद शाळा नावळे येथे सात दिवसीय निवासी शिबीर*

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत नावळे या गावात सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर १६ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात पाच दिवसीय योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या सात दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावात विविध समाजोपयोगी व विकासात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये गाव स्वच्छता मोहीम, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, आरोग्य व स्वच्छतेविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती व डिजिटल साक्षरता यासारखे उपक्रम समाविष्ट आहेत.
यासोबतच, आरोग्य तपासणी शिबिरे, महिला व युवकांसाठी मार्गदर्शन सत्रे, शासकीय योजना व हक्कांविषयी माहिती देणे, तसेच सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांतून गावकऱ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांना सक्षम बनविणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरामुळे NSS स्वयंसेवकांमध्ये सेवाभाव, शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना व सामाजिक जबाबदारी यांचा विकास होणार आहे. “Not Me But You” या NSS च्या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव मिळणार असून ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान देण्याची संधी प्राप्त होणार आहे.
महाविद्यालय प्रशासन, NSS कार्यक्रम अधिकारी तसेच नावळे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीरीत्या राबविण्यात येणार असून, या उपक्रमामुळे गाव व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
या श्रमसंस्कार शिबिरामध्ये सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन, महाविद्यालयाचे प्राचार्य व राष्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा