You are currently viewing आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल अध्यक्षपदी : कवी, साहित्यिक मनोहर पवार यांची निवड

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल अध्यक्षपदी : कवी, साहित्यिक मनोहर पवार यांची निवड

पुणे / (बबनराव वि.आराख) :

दरवर्षी आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान अंतर्गत पूणे येथे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल चे आयोजन मा . फुले प्रेमी विजय वडवेराव यांच्या अथक प्रयत्नाने केले जात असून, फेस्टिवलमध्ये भारतासह विदेशातूनही तमाम फुले प्रेमी, कवी साहित्यिक सहभागी होणार आहेत.दरम्यान सदर कायर्यक्रमाची नोंद ‘लिमका बुक’मध्ये नोंद झाली असून, या फेस्टिवल मध्ये कवी साहित्यिक मनोहर पवार केळवदकर यांची संमेलन अध्यक्षपदी निवड झाली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच साहित्यिक मनोहर पवार यांना मिळाले असून, त्यांना सदर कार्यक्रात काव्य वाचनासही आमंत्रीत करण्यात आले आहे .

एस एम जोशी फाऊंडेशन सभागृह पुणे येथे आयोजित दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे – २० २६ चे दि.२,३,४, रोजी आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रासह इतर राज्य आणि बाहेरील देशातून कवी सहभागी होणार आहेत .बुलढाणा जिल्ह्यातील केळवद चिखली येथील प्रसिद्ध लेखक,कवी,शाहिर मनोहर पवार यांची या संमेलानात मुख्य आयोजक फुले जागर अभियानाचे प्रवर्तक फुलेप्रेमी मा .विजय वडवेराव यांनी एका निवड पत्राव्दारे घोषणा केली असून त्या कार्यक्रमात त्यांना ‘ निमंत्रीत केले आहे. कवी साहित्यिक मनोहर पवार यांनी यापूर्वीही या फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला आहे . यांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, पंजाब, मुंबई नागपूर, पुणे, आदी ठिकाणी विविध कला महोत्सव, अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग घेतला असून विविध पुरस्कार मिळाले असून विविध साहित्य चळवळीत पदाधिकारी असून साहित्य, कला, अभिनय, चित्र, लेखन यात सात्यत्याने सहभाग तसेच साहित्य सेवा अविरत सुरु आहे . त्यांचा या निवड सहभागासाठी त्याचे अभिनंदन होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा