मिना करंजावणे यांना राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्कार .
पुणे
10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे मराठा चेंबर या ठिकाणी वितरण सोहळ्याचे मानवाधिकार दिनानिमित्त पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मानवाधिकार कार्यकर्ते यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यावर्षी मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या महिला शहराध्यक्षा सौ मिना करंजावणे यांना मानवधिकार पुरस्कार पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या न्यायमूर्ती रेवती देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन, यांच्या हस्ते देण्यात आला.त्यांनी आतापर्यंत 200 सामाजिक,आरोग्य ,शैक्षणिक, पर्यावरण ,साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले असून कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे त्यांच्या या कार्याची संस्थेचे निवड समितीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड दखल घेऊन त्यांची निवड केली आहे. त्या उच्चशिक्षित असून जागतिक पातळीवरील कंपनीमध्ये व्यवस्थापक या पदावर कार्यरत असूनही सामाजिक क्षेत्रात काम करण्याची त्यांना खूप त्यांना आवड आहे.
यावेळी मिना करंजावणे म्हणाल्या की मी आजवर केलेल्या सामाजिक कामाची संस्थेने नोंद घेतली खूप आनंद झाला यापुढे मी अधिक जोमाने काम करेल.
याचवेळी पिंपरी चिंचवडच्या,मिना करंजावणे, सुजाता इळवे,प्रतिमा काळे,सचिव गजानन धाराशिवकर आणि कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांची राज्यस्तरीय मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय मानवधिकार पुरस्कारामध्ये राज्यातील संस्था, व मानवधिकार पुरस्कार 20 जणांना दिला तर त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे 5 व्यक्तींचा समावेश करण्यात आला अशी निवड समितीचे अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी दिली.
यावेळी पुणे जिल्हा सत्र न्यायमूर्ती महेंद्र हे.महाजन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या न्यायमूर्ती रेवती देशपांडे, निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे,प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर,जाधवर ग्रुपचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, विशेष पोलीस महानिरीक्षक (सीआयडी) सुरेश खोपडे,संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आण्णा जोगदंड तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर ,पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष काळूराम लांडगे,राम पाटील,प्रकाश बोदाडे,आण्णा मंजुळे,आकाश भोसले,उपस्थित होते.
सूत्रसंचालन मोनिका जोशी व विक्रम शिंदे यांनी केले .
