*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन…!!*
ब्रम्हतेज ब्रम्हरंध्रातून धरेवर
अविनाशी तत्व जागवतोस
ब्रम्हांड तेजात उजळताच
अंगणी…माझ्या येतोस..
संमोहनाचा अमोघ बाण
विश्वरूपाच्या ह्दयांत मारलास
रेशमीदुकूल अलंकृत पानाफुलांत
ऐश्वर्य…प्राप्तीस शिरलास ..
तुझ्या..परागकणांनी प्रेमसुधा
नृत्यमुद्रेत रममाण झाली
आकाशगंगेत स्नान करून
ईश्वरासोबत डोलू लागली..
जाणिवांच्या कोवळ्या देठापाशी
भावपंचमाचा …सूर लावलास
उचंबळून येताच… रसरंग
तू ..ईश्वराचा हात ..धरलास..
मुक्यानेच..अंगण झालं हळवं
कायेत…..शृंगाराचा साज
सुखसाजणीचा मोहर सावळा
आत्मसुखदा…विराजली आज..
बाबा ठाकूर
