*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
__________________________
श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – ५३ वे
श्री स्वामींची भ्रमणगाथा..(मंगळवेढा)..
___________________________
बसप्पा असो कुठे ही
तो समर्थ दर्शनास येई
प्रपंचात त्याच्या कटकटी
बायको त्याची वैतागून जाई ।।
बसप्पाचे वागणे सदा असे
तिला मुळीच पसंत नसे
रागाच्या भरात ती मग
बसप्पाशी भांडत बसे ।।
स्वामी-भक्ती कमी ना झाली
स्वामी दर्शनाची गोडी वाढली
बायको बसप्पाची रागातच
मजुरीला बाहेर पडू लागली। ।।
येऊ नको तू असा मागे मागे
मार्ग हा फार खडतर असे
त्यास स्वामींचे हे सांगणे होते
तरी बसप्पाने येणे सोडले नव्हते। ।।
***************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.
___________________________
