You are currently viewing जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे येथे राष्ट्रीय पक्षी सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे येथे राष्ट्रीय पक्षी सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे येथे राष्ट्रीय पक्षी सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

काळसे
वाईल्ड लाईफ कंजर्वेक्षण सोसायटी ऑफ सिंधुदुर्ग (WCSS) अंतर्गत राष्ट्रीय पक्षी सप्ताह 2025 निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे नं. 01 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळसे भंडारवाडा येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज दिनांक 12/11/2025 रोजी उत्साहात संपन्न झाला.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी वाईल्ड लाईफ कंजर्वेक्षण सोसायटी ऑफ सिंधुदुर्गचे सचिव श्री. संदेश सहदेव डिकवलकर यांनी पक्षी संवर्धनाचे महत्त्व तसेच स्थलांतरित पक्ष्यांविषयी सविस्तर व मार्गदर्शक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी निसर्ग व पक्षी संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास काळसे ग्रामपंचायत सरपंच सौ. विशाखा विजय काळसेकर, WCSS सचिव श्री. संदेश सहदेव डिकवलकर, WCSS कार्यकारिणी खजिनदार श्री. विक्रम विठ्ठल डिकवलकर, सहखजिनदार श्री. विजय बुधाजी काळसेकर, सौ. शुभ्रा संदेश डिकवलकर तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवर्ग व WCSS सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.

प्रतिक्रिया व्यक्त करा