You are currently viewing आनंदयात्री

आनंदयात्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आनंदयात्री*

 

चालतो मनाच्या शांत वाटांनी,

तोच खरा आनंदयात्री,

पावलांवर धूळ,

पण अंतर्मनात उजेडाची

सतत तेवणारी ज्योत .

त्याच्या मार्गाला

शेवट कधीच नसतो;

प्रत्येक दिवस देतो

नवी दिशा नवा मार्ग

आणि वेळ शांतपणे

त्याच्या प्रवासाला

देत जाते नवा अर्थ.

पावसात, उन्हात, गोंगाटात

स्वतःच्या श्वासांचा मृदू स्वर

तो जपून ऐकतो,

जणू जीवनालाच

हळूच साद घालतो.

लहान लहान क्षणांत

त्याला आनंद सापडतो,

कोवळं हसू

मूक संकेत

आणि कुठल्याही शब्दांशिवाय

आश्वासक ऊब.

जग जिंकणं नव्हे,

स्वतःला भेटणं,

हीच त्याची वाट.

कारण प्रवास नसतोच बाहेरचा

तो असतो प्रवाही अंतराचा

आणि या मार्गावर

कधी थकलेले, कधी उमललेले

आपण सगळेच,

शोधात चालत राहणारे

अनंत आनंदयात्री.

 

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा