*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल वेंगुर्ला येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न ….*
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेमध्ये मध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञान, आत्मविश्वास आणि संघभावना वाढवण्याच्या उद्देशाने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पर्धेचे परीक्षक गजानन पालयेकर सर यांचे स्वागत करण्यात आले.ही प्रश्नमंजुषा स्पर्धा रेड हाऊस,ग्रीन हाऊस, ब्ल्यू हाऊस व येलो हाऊस अश्या चार संघामध्ये झाली. या स्पर्धेमध्ये बॉक्समधून प्रश्न निवडणे,रॅपिड फायर, आणि बजर राऊंड अशा अनेक फेऱ्या होत्या.प्रत्येक फेरी विद्यार्थ्यांच्या मनाची उपस्थिती आणि विषय ज्ञान तपासण्यासाठी तयार करण्यात आली होती.
सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट संघभावना आणि स्पर्धात्मक भावना प्रदर्शित केली. इतर विद्यार्थ्यांनीही प्रश्नमंजुषा स्पर्धेचा आनंद घेतला आणि त्यांच्या आवडत्या संघाचा जयघोष केला. शेवटी ग्रीन हाऊस हा संघ सर्वाधिक गुण मिळवून विजेता ठरला . स्पर्धेचे परीक्षक गजानन पालयेकर सर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .एकूणच प्रश्नमंजुषा स्पर्धा खूप यशस्वी झाली.
