You are currently viewing झुंजूमुंजू..
Oplus_16908288

झुंजूमुंजू..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झुंजूमुंजू…*

 

झुंजूमुंजू व्हयनं व दिन्ही कोंबडानी बांग

कंबर हालाये चालस देखा बदकेसनी रांग

कलकल करतसं बोली समजत नही

चालनात नदीवर एकमेकले बलाई..

 

बांग देता कोंबडानी घरधनी तो उठना

फडफड कोंबडानी मावठीवर तो बठना

बें बें बकऱ्या करेत दावं सोडे घरधनी

दुध पेयेत ते पोरे बकरी तृप्त व्हये मनी…

 

सडा सारवन करे घरोघरनी ती माय

कोनी तपाडे ते दूध दुधवर धरे साय

उडे धव्वाडा गलीम्हा बैलगाडासनी धूम

हाती टायचिपया नि कोनी बोले राम राम..

 

पायठाम्हा आंगनम्हा वासुदेवन्या गिरक्या

गाना कितला मज्याना नाच नाचत दुडक्या

वाडवडीलना नावे वासुदेवना मुखमा

दानाभरीन सुपडं दारे लये ती रखमा…

 

टाके झोयीम्हा त्या दाना वासुदेव गरगर

करे उद्धार मुखमा तिनं सासर माहेर

बांधी भाकर चटनी धरे वावरनी वाट

घरधनी धुरकरी बांधवर जाये थेट…

 

नही सवड कोनले बकरक्या बी निंघना

बकऱ्या पयेत भन्नाट मांगे बकरक्या चालना

मोती राखे बकऱ्यासले त्याले भ्यायेत बकऱ्या

निमवर बठीसन पावा वाजस तो पोऱ्या…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा