You are currently viewing मंदिर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद,

8,970 ग्रामस्थांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेला मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.  जिल्ह्यातील 443 मंदिरात कायक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 8 हजार 970 ग्रामस्थांनी श्रमदान केले आहे. या कार्यक्रमांतर्गत 625 किलो प्लास्टिक कचरा तर 1 हजार 487 अन्य असा 2 हजार 112 किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. या कचऱ्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन योग्य विल्हेवाट लागण्याबाबत ग्रामपंचायतीना सुचना देण्यात आली असल्याची माहिती  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांची ये-जा होत असते. उत्सव, जत्रा, पालख्या, धार्मिक सोहळे अशा प्रसंगी येणारी गर्दी वाढत आहे. यामुळे या परिसरात प्लास्टिक, कागद, कोरडे गवत, पानफुलांचे अवशेष आदी कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र राहणे हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर समाज आरोग्य, पर्यटन विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. या हेतुने स्वच्छ भारत मिशन (ग्रा), जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,  जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन दिनांक  9 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सकाळी 8 ते 11 या कालावधीत मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांस जिल्हावासियांनी उस्फुर्त प्रतिसाद देत श्रमदान करुन जिल्ह्यातील 443 मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये देवगड तालुक्यात 102 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 2 हजार 82 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 270 किलो प्लास्टिक व 662 किलो अन्य कचरा असे 932 किलो कचरा गोळा केला आहे.  वैभववाडी तालुक्यात 39 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 1 हजार 65 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 58 किलो प्लास्टिक व 54 किलो अन्य कचरा असे 112 किलो कचरा गोळा केला आहे. कणकवली तालुक्यात 63 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 700 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 10 किलो प्लास्टिक व 132 किलो अन्य कचरा असे 142 किलो कचरा गोळा केला आहे.

मालवण तालुक्यात 65 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 1 हजार 739 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 98 किलो प्लास्टिक व 122 किलो अन्य कचरा असे 120 किलो कचरा गोळा केला आहे. कुडाळ तालुक्यात 54 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 862 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 56 किलो प्लास्टिक व 71 किलो अन्य कचरा असे 127 किलो कचरा गोळा केला आहे. वेंगुर्ला तालुक्यात 59 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 1 हजार 18 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 46 किलो प्लास्टिक व 270 किलो अन्य कचरा असे 316 किलो कचरा गोळा केला आहे. सावंतवाडी तालुक्यात 27 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 680 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 8.5 किलो प्लास्टिक व 37 किलो अन्य कचरा असे 64 किलो कचरा गोळा केला आहे. दोडामार्ग तालुक्यात 34 मंदिराची स्वच्छता करण्याकरीता 824 ग्रामस्थांनी श्रमदान करुन 77.5 किलो प्लास्टिक व 139 किलो अन्य कचरा असे 216.5 किलो कचरा गोळा केला आहे. जिल्ह्यातील 443 मंदिरात मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना 4 हजार 608 पुरुष तर 4 हजार 362 महिलांनी श्रमदान केले आहे. जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचे योग्य नियोजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा