कणकवली
येणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून नृत्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने मोफत नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य परिषदेच्या कणकवलीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. हि कार्यशाळा तालुकानिहाय होणार असून यात जास्तीतजास्त महिला आणि युवतींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नृत्य परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष राहुल राजदत्त कदम यांनी केले आहे.
नृत्य परिषद सिंधुदुर्ग यांची सभा अलीकडेच कणकवली येथे पार पडली. यात काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या सभेत कु.सिद्धी मसुरकर हिची नृत्य परिषद महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या कणकवली तालुका सहसचिवपदी निवड करण्यात आली. तसेच संतोष पुजारे यांची जिल्हा आयोजन समिती प्रमुख म्हणून तर संजय पेठकर यांची सहप्रसिद्धीप्रमुख निवड करण्यात आली. या तिन्ही नृत्यकर्मींना नियुक्तीपत्र देण्यात आली.
नृत्य परिषदे मार्फत महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवती आंणि महिला भगीनींसाठी तालुकानिहाय नि:शुल्क नृत्य कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्यांची सांगता ६ मार्च २०२१ ला महिलांच्या भव्य कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 9356981454, 9730251525, 7745088951, 9322628575, 8275364999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नृत्य परिषदेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष राहुल राजदत्त कदम यांनी केले आहे.
या सभेला राहुल कदम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र विभाग सहसचिव सागर सारंग, जिल्हा सहपालक सुदेश वाडकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.