“सामाजिक विषयाला बुस्टर देण्याचे डॉक्टर राजेश नवांगुळ यांचे प्रयत्न कौतुकास्पद “..अँड.नकुल पार्सॅकर
सावंतवाडी
वंध्यत्व हा एक गंभीर सामाजिक विषय आहे.ज्यामुळे महिलांचा मानसिक, शारीरिक छळ होतो.वैद्यकीय क्षेत्रातील झालेल्या अमुलाग्र बदलामुळे आणि संशोधनामुळे पूर्वीपेक्षा आज या समस्येवर मात करता येते.वांझोटी हा मनं चिरून टाकणारा शब्द वापरल्याने मानसिक छळ व परिणाम झाल्याने पूर्वीच्या काळी आमच्या काही भगिनींनी आपले जीवन संपविल्याच्या हृदयद्रावक घटना आपण अनेकदा पेपरमधून वाचलेल्या आहेत.
आपला समाज हा रुढी,परंपरा,संस्कृती जपणारा आहे तसाच तो अतिरेकी सामाजिक परंपराच्या आहारी पण जाणारा आहे.प्रजननाला फार महत्त्व दिले जाते.त्यामुळे वंध्यत्व हे ञासदायक आहे.ज्याना मुलं होत नाही त्यामध्ये अनेकदा संबधित जोडप्याची कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता बिचार्या स्ञीलाचं जबाबदार धरले जाते.
वंध्यत्वाच्या सामाजिक परिणामांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय समाजात आई किंवा माता होणे प्रतिष्ठेचे समजले जाते.आपल्या घराण्याला वंशाचा दिवा पहिजे,ही भावना द्रुढ होते.
वंध्यत्व असलेल्या जोडप्याचे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध ताणले जातात.घटस्फोटाचे प्रमाण वाढते.संबधितांचे मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य धोक्यात येते.पदरी नैराश्य आणि चिंता..
माञ वैद्यकीय क्षेञात झपाट्याने झालेल्या क्रांतिकारक बदलाचा आपल्या संशोधक व अभ्यासू स्वभावाने या सामाजिक समस्येवर आपल्या सिंधुदुर्गात सावंतवाडी शहरात अगदी सहजपणे पर्याय उपलब्ध कुणी करून दिला असेल तर आमचे अष्टपैलु मिञ आणि यशराज मॅटर्निटी होम सावंतवाडीचे सर्वेसर्वा डॉक्टर राजेश सुधाकर नवांगुळ यानी. सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने त्या अनुषंगानेच आमच्या डॉक्टर मित्राने सर्व अद्ययावत सोयीनी युक्त असे हॉस्पीटल सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारले.माञ वंध्यत्व या सामाजिक विषयावर आपण मात केली पाहिजे हा त्यांचा आग्रह. पुणे,मुंबई सारख्या महानगरातील सुविधा सावंतवाडी सारख्या छोट्याशास शहरात झाल्यास सिंधुदुर्ग व लगतच्या लोकानां कमी खर्चात व कमी वेळेत ही सुविधा द्यावी यासाठी आधुनिक,अद्ययावत आयव्ही एफ सेंटर उभारण्याचा संकल्प त्यानी पाच वर्षांपूर्वी केला.हा माणूस एकदा ठरवले की त्याचा सतत पाठलाग करणारा.स्वप्न नुसती पहायची नसतात,नाहीतर दिवसाढवळ्या मुंगेरीलालची स्वप्न पहाणारे आपल्याला अनेकजण भेटतात.
संकल्पपूर्तीसाठी डॉक्टर राजेश आणि प्रत्येकवेळी पहाडा सारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या असणार्या त्यांच्या कष्टाळू पत्नी सौ मनिषा यानी वर्षभरात हे केंद्र सुरु केले.सव्वा वर्षांपूर्वीच या नामांकित वंध्यत्व निवारण केंद्राचे उद्घाटन गोव्यातील याच क्षेत्रातील नावाजलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर केदार पडते यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न झाले.ज्या सोहळ्यात मला सहकुटुंब सहभागी होण्याचे भाग्य लाभले.अर्थात या डॉक्टरांच्या स्वप्नातील प्रकल्पाला नाव सुद्धा अतिशय समर्पक असेच देण्यात आले.”आई टेस्ट टय़ूब बेबी सेंटर”…
डॉक्टरांचे स्वप्न पूर्ण झाले पण खरी स्वप्नपूर्ती तेव्हाच जेव्हा वंध्यत्वाने ग्रासलेली व ञासलेली एखादी स्री जेव्हा डॉक्टरांकडे येते व मोठ्ठ्या अपेक्षेने म्हणेल,” डॉक्टर,मला आई व्हायचे आहे”..आणि अशा त्या आमच्या भगिनीला सकारात्मक परिणाम मिळतात तेव्हा मातृत्वासाठी आसुसलेल्या त्या भगिनीला होणारा आनंद आणि यशराज परिवाराला होणारा अत्यानंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही.
होय , आठ दिवसांपूर्वीच डॉक्टर नवांगुळ यांच्या या केंद्रात हा पहिला प्रयोग यशस्वी झाला.ज्या दांपत्याला हे अपत्य प्राप्त झाले त्या दांपत्यवर व त्या बेबीवर सौ.मनिषा नवांगुळ यानी सुगंधित चाफ्यांच्या फुलांचा वर्षांव करून आनंद साजरा केला.खरे तर मला सुद्धा आमच्या या डॉक्टर मिञाचे,नेहमीच त्यांचा उजवा हात म्हणून काम करणारे त्यांचे कंपाऊंडर नाना शेंडगे आणि यशराजचे सगळे व्यवस्थापन कुशलतेने सांभाळणाऱ्या सौ.मनिषा नवांगुळ यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करायचे होते पण गेले दोन आठवडे सारखा प्रवासात असल्याने राहून गेले.त्यामुळे हे जाहीर अभिनंदन!

