You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम

भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम

_*भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम…..*_

_सावंतवाडी

_सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.वेदा प्रवीण राऊळ हिने ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, निरवडे येथे पार पडले. या प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत तिने हे यश मिळवले. यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली असून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. वेदाने मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा