You are currently viewing वृत्त – पादाकुलक

वृत्त – पादाकुलक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वृत्त – पादाकुलक*

 

 

प्रेमात तिच्या पडतो आता

का म्हणून मी फसतो आता

 

देऊन दगा निघून गेली

स्मरणात तिच्या रमतो आता

 

आठवण तिची रोजच येते

फोटोत तिला बघतो आता

 

विस्तव विझला झाली रक्षा

दुःख सोसुनी जगतो आता

 

फार यातना होतात जरी

विरहात शशी फिरतो आता

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा