You are currently viewing आज किती दिवसानंतर..

आज किती दिवसानंतर..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आज किती दिवसानंतर..*

 

दिसलास तू अचानक

आज किती दिवसानंतर

आयुष्यात आता मात्र

घडून गेले स्थित्यंतर….

 

आज किती दिवसानंतर

मनात जाईजुई उमलली

आठवांचा गंध दाटला

ह्रदय पाकळी‌ खुलली….

 

आज किती दिवसानंतर

बरसल्या श्रावणाच्या सरी

चिंब भिजून नटली धरा

कोंबांना आली तरतरी….

 

आज किती दिवसानंतर

आभाळ भरलं चांदण्यांनी

दिव्य तेज , शीतल चंद्रमा

गातं आभाळ आनंद गाणी…

 

आज किती दिवसानंतर

कविता सुचली लिहायला

शब्द बागडले मनात आणि

अधीर वहीवर उतरायला….!!

 

अरुणा दुद्दलवार

प्रतिक्रिया व्यक्त करा