भालचंद्र महाराज संस्थानची ११ जानेवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा…
कणकवली
शहरातील भालचंद्र महाराज संस्थानची जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा ११ जानेवारीला होणार आहे. कणकवली कॉलेज कणकवली आणि कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) च्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले विद्यार्थी या सराव परीक्षेस बसू शकतील. या परीक्षेसाठीचे प्रवेश अर्ज भालचंद्र महाराज संस्थान कणकवली आणि कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथील श्री.कुलकर्णी आणि श्री.रावजी परब यांच्याकडे उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबरला असल्याची माहिती आज भालचंद्र महाराज संस्थानतर्फे देण्यात आली.

