You are currently viewing कृषीभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे मंडळ निहाय कृषी मेळावा उत्साहात संपन्न.

कृषीभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे मंडळ निहाय कृषी मेळावा उत्साहात संपन्न.

कृषीभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण येथे मंडळ निहाय कृषी मेळावा उत्साहात संपन्न.

चिपळूण-मांडकी पालवण.

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मंडळ निहाय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात विद्यापीठातील नामांकित शास्त्रज्ञ डॉ. संतोष वरवडेकर, डॉ.अजय राणे , डॉ. मंदार खानविलकर व डॉ.सुदेशकुमार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यामध्ये बांबु लागवड, मातीची तपासणी, मृद आरोग्य व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर, पिका नुसार खत व्यवस्थापन, आंबा व काजू पिकावरील किड व रोग व्यवस्थापन, सेंद्रीय शेती व आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयांवर सविस्तर व्याख्याने देण्यात आली. मातीचे आरोग्य सुधारल्यास उत्पादन वाढून शेती अधिक किफायतशीर होते, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. तसेच श्री. प्रतीक चव्हाण व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लिमिटेड यांनी शेतकऱ्यांसाठीच्या बँकेच्या विविध योजने विषयी माहिती दिली.

कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील अडचणी शास्त्रज्ञांसमोर मांडल्या आणि त्यावर तज्ञांकडून प्रत्यक्ष उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमा दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण श्री.शिवाजी शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले, तसेच तालुका कृषी अधिकारी चिपळूण श्री शत्रुघ्न म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तरे दिली व महाविस्तर AI app विषयी माहिती दिली. मंडळ कृषि अधिकारी सावर्डा श्रीमती कोमल घोडके यांनी कृषि विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने विषयी(PMFME )मार्गदर्शन केले.

या मेळाव्यासाठी कृषी विभाग आणि शिक्षण संस्थांचे अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. श्री. शिवाजी शिंदे,उपविभागीय कृषी अधिकारी.,श्री. भीमाशंकर कोळी कृषी अधिकारी, चिपळूण.,श्री. शत्रुघ्न मित्रे तालुका कृषी अधिकारी, चिपळूण., सौ. कोमल घोडके ,मंडळ कृषी अधिकारी, सावर्डा., श्री. पंकज साडविलकर उपव्यवस्थापक (आरडीसीसी)., डॉ. संकेत कदम प्राचार्य गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय., डॉ. शमिका चोरगे प्राचार्य जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .प्रा. सिद्धी नाईक, प्राध्यापक वनस्पतीशास्त्र यांनी केले व डॉ. संतोष वरवडेकर यांनी आभारप्रदर्शन केले. प्रा. प्रशांत इंगवले कृषि विस्तार विभाग यांनी तांत्रिक सहाय्य केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा