You are currently viewing शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा

शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा

शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांना लिहिलेले पत्र शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी रविवारी वेंगुर्ले शिवसेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.

आपण यापुढेही शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. आपल्याला तालुका प्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचा आपण आयुष्यभर ऋणी राहीन असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा