*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*साशंकता*
〰️〰️〰️
जगता जगता कळू लागले
नाते ऋणानुबंधी वेगवेगळे
मन साशंक हे झाकोळलेले
गुढत्वातील भावार्थ नाकळे
जन्म एकदा मरणही एकदा
दान भाळीचे जीवा वेगवेगळे
मनतरंगी भावनांचे रंगबिरंगी
आसक्तीचेच बेमालूमी सोहळे
वाटे मज मी एकटा सार्वभौमी
भ्रम अविवेकी ते वास्तव वेगळे
गुंतत जाता हाच जीव भाबडा
निर्मळी प्रितीचे शाश्वत कोवळे
परी जीवनी भास शून्यत्वाचा
सत्य प्रीती न कुणास आकळे
आकांत अंतरी भावकल्लोळी
कुठे कसे करावे हे मन मोकळे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि.ग . सातपुते. (भावकवी).*
*📞( 9766544908)*

